कुमारस्वामींच्या वक्तव्याने युतीबाबत अनिश्चितता
बंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. धजद-भाजप युतीची भाजप नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कालच घोषणा केली असताना, धजद नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आज, युतीला अद्याप वेळ असल्याचे सांगून अनिश्चितता व्यक्त केली.
जे. पी. नगर, बंगळूर येथील तिरुमलागिरी मंदिरात विशेष पूजा आणि होम कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युतीबाबत या टप्प्यावर काहीही बोलणार नाही. कोण कोणासाठी आवश्यक नसल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
परंतु माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी म्हटले होते की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने धजद सोबत युती केल्यास राज्यात भाजप मजबूत होईल.
युती करून जास्त जागा जिंकणे शक्य आहे. यासंदर्भात नवी दिल्लीत चर्चा सुरू आहे. येडियुरप्पा यांनी काल सांगितले की धजदचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती करण्यास सहमती दर्शवली आहे. अमित शाह यांनी लोकसभेच्या चार जागा धजदला देण्याचे मान्य केले आहे. अशा प्रकारे, भाजप धजदला लोकसभेच्या चार जागांवर लढण्याची परवानगी देईल आणि उर्वरित जागांवर भाजप लढेल. मी युतीचे स्वागत करतो. त्यामुळे आम्हाला अधिक जागा जिंकण्यास मदत होईल. येडियुरप्पा म्हणाले की, युतीला २५ ते २६ जागा जिंकण्याचा विश्वास आहे.
कुमारस्वामी यांच्या चांगल्या राजकीय भवितव्यासाठी पूजा-होम-हवन आयोजित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हिंदू परंपरेनुसार पूजा केली जात आहे आणि मी आजारातून बरा झालो आहे. कुमारस्वामी म्हणाले की, माझ्या वडिलांची (एच. डी. देवेगौडा) त्यांच्या प्रकृतीसाठी पूजा करण्यात आली. देवेगौडा यांचे कुटुंब ज्योतिषशास्त्रावरील विश्वासासाठी ओळखले जाते.
देवेगौडा युतीची घोषणा करण्यापूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
अस्तित्वासाठी युती आवश्यक
धजद कोअर कमिटीचे अध्यक्ष आमदार जी. टी. देवेगौडा यांनी मात्र धजदच्या अस्तितिवासाठी भाजपसोबत युती आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, येत्या काही दिवसांत काहीतरी करणे आवश्यक आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीतच समझोता करण्याची विनंती मी मी पक्षाचे ज्येष्ठ नेते एच. डी. देवेगौडा यांना केली आहे.
नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत आमदार, विधान परिषद सदस्य आणि नेते सहभागी झाले होते. १० सप्टेंबर रोजी बंगळुर येथे होणाऱ्या मेळाव्याबाबत मतं गोळा करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी काँग्रेसच्या दडपशाहीबद्दल तक्रार केली. पिरीयापट्टणमध्ये कार्यकर्त्यांना तुरुंगात पाठवण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. कार्यकर्त्याना संरक्षण मिळत नाही. हमी योजनामुळे विकास खुंटला आहे. कंत्राटदार अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला पाहिजे. त्यामुळे भाजपसोबत युतीला प्राधान्य दिल्याचे ते म्हणाले.
आम्हाला काँग्रेससोबत जायचे नाही. या काँग्रेसने आघाडी सरकारमध्ये कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले होते. लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जावे, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. आमदार जी. टी. देवेगौडा म्हणाले की, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आम्हा सर्वांना धीर दिला.
आज महत्वाची बैठक
आज (ता. १०) बंगळुर येथील पॅलेस मैदानावर मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाचा पॉवर शो होणार आहे. कुमारस्वामी यांचा भाजपला विरोध नाही. मी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मताच्या बाजूने आहे. भाजपमध्ये गेल्यामुळे पूर्वी लोकांनी मला मारहाण केली. पण, आता परिस्थिती बदलली आहे. युतीला आता कोणी विरोध करत नाही. आपण काँग्रेसच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta