खानापूर : होन्नावरजवळील कासरकोड येथील टोंका बिचवर आज (रविवार) सकाळी तब्बल दीड टन वजनाचा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वनविभाग आणि पशु संगोपन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची शवचिकित्सा करून मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू केला आहे.
स्वच्छ आणि निसर्गरम्य इको बीच म्हणून टोंका बिचची ओळख आहे. आज सकाळी लाटांच्या बरोबर किनाऱ्यावर मृत व्हेल मासा येऊन पडल्याचे दिसून आले. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच एसीएफ एस. एस. निंगाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दीड ते पावणे दोन टन इतके माशाचे वजन असून, तो पाहण्यासाठी नागरिकांनी बिचवर गर्दी केली होती. गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
Belgaum Varta Belgaum Varta