बेंगळुरू : एका व्यावसायिकाला आमदारकीचे तिकीट देण्याचे आमिष दाखवून ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी अभिनव हालश्री स्वामीजी याला बेंगळुरू सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे.
चैत्रा कुंदापूर व टोळीला फसवणूक प्रकरणात अटक झाली असताना फरार झालेल्या अभिनव हालश्रीने अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने या अर्जाची सुनावणी पुढे ढकलली. यानंतर अभिनव हालश्रीला सीसीबी पोलिसांनी कटक, ओडिशात अटक केली.
ते भुवनेश्वर ते बोधगया या रेल्वेने जात होते. यावेळी ओडिशा पोलिसांच्या मदतीने हलश्रीला अटक करण्यात आली. सीसीबी पोलीस त्याला आज रात्री बेंगळुरूला आणणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta