
बेंगळुरू : कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारने शनिवारी (दि.३०) बेंगळुरूमध्ये चालत असलेल्या पती-पत्नीला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. बेंगळुरूमधील कुमारस्वामी वाहतूक पोलिस ठाण्यात या कन्नड अभिनेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने दिले आहे.
पोलिसांनी तक्रार नोंदवून घेताना वेगात आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याचे म्हटले आहे. ‘तगारू पल्या’ या कन्नड चित्रपटात अभिनय केलेल्या नागभूषण बेंगळुरूमध्ये शनिवारी रात्री ९.४५ च्या सुमारास कारने जात होता. दरम्यान वसंता पुरा मुख्य रस्त्यावरील फुटपाथवरून चालत असलेल्या जोडप्याला नागभूषण याच्या गाडीने मागून धडक दिली. हे जोडपे उत्तरहल्लीहून कोननकुंटेकडे निघाले होते. या धडकेत संबंधित महिलेचा मृत्यू झाला तर, पुरूषावर उपचार सुरू आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागभूषणने स्वत: या जोडप्याला रुग्णालयात नेले. पण प्रेमा (वय-४८) या महिलेचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. तर तिचा नवरा कृष्णा (वय-५८) याच्या दोन्ही पायांना, डोक्याला आणि पोटाला दुखापत झाली असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta