Monday , December 8 2025
Breaking News

म्हैसूर दसऱ्यावर दहशतवाद्यांची नजर

Spread the love

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेची माहिती; हाय अलर्ट जाहीर

बंगळूर : जगप्रसिद्ध नाडहब्ब म्हैसूर दसरा उत्सवाचे मुख्य आकर्षण जंबो सवारी दहशतवाद्यांच्या छायेत असून, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात तत्काळ सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पाकिस्तान आणि इसिसचे ७० अतिरेकी बनावट पासपोर्ट घेऊन भारतात घुसले असून नवरात्रीच्या काळात कर्नाटकातील म्हैसूर, पश्चिम बंगालमधील कोलकोत्ता आणि गुजरातमधील अहमदाबाद या शहरांवर दहशतवाद्यांचा डोळा आहे, असा इशारा दिला आहे.
म्हैसूरमधील जगप्रसिद्ध दसरा आणि पश्चिम बंगालमधील काली उत्सव आणि गुजरातमधील नवरात्रोत्सवादरम्यान रक्तपात करण्यासाठी पाकिस्तान आणि इसिसच्या ७० दहशतवाद्यांनी बनावट पासपोर्टसह घुसखोरी केली असावी, अशी माहिती गुप्तचर विभागाने केंद्रीय गृह विभागाला दिली आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी कर्नाटकच्या गृह विभागाचे सचिव, गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि पोलीस महासंचालक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून म्हैसूरमध्ये सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्याचे कळते.
या पार्श्‍वभूमीवर गृहराज्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून दसरा सणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हैसूर आणि मंगळूरमध्ये सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात यावा आणि संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट जाहीर करण्यात यावा, असा इशारा दिला आहे.
दसरा साजरा करण्यासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने लोक येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आलोक मोहन यांना सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर म्हैसूर, केएसआर धरण भागात कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या विदेशी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली आहे. म्हैसूरमधील लॉज, होम स्टे, हॉटेल्स, आयबी आणि इतर ठिकाणी काल रात्रीपासून सुरक्षा वाढवण्यात आली असून संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे.
बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी शहरात येणाऱ्यांचे ओळखपत्र व आधारकार्ड तपासले जात आहे. तसेच यापूर्वी लॉज होम स्टे व इतर ठिकाणी राहणाऱ्यांची माहिती ब्लॅक आऊट करण्यात आली आहे.
स्थानिकांच्या रुपात दहशतवादी हल्ला करू शकतात, या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी साडेतीन हजार पोलीस, केएसआरपी, आरएएफ आणि गुप्तचर विभागाला दसरा सण संपेपर्यंत कर्तव्यावर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातून रॅपिड टास्क फोर्सची एक टीम म्हैसूरमध्ये दाखल झाली आहे.
म्हैसूर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याने संभाव्य हल्ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह विभागाच्या सूचनेवरून कुशल पथक पाठवण्यात आले आहे.दसर्‍यासोबतच सध्या देशात आयसीसी विश्वचषक स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे सामना पाहण्यासाठी परदेशातून लोक भारतात आले आहेत.
काही दहशतवादी बनावट पासपोर्ट मिळवून प्रेक्षकांच्या वेशात भारतात घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच केंद्रीय गुप्तचर संस्थेने कर्नाटक सरकारला नाडहब्ब म्हैसूर दसऱ्यादरम्यान कोणत्याही प्रकारच्या किरकोळ विचलनावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *