
भाजपवर जोरदार हल्ला; आमदाराना अमिषाच्या आरोपाने खळबळ
बंगळूर : कर्नाटक भाजपने राज्यातील आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. त्यांचा हा प्रयत्न हस्यास्पद असून तो यशस्वी होणार नसल्याचे सांगितले. मंड्या काँग्रेसचे आमदार रविकुमार गौडा (गनिगा) यांनी वादाला तोंड फोडल्यानंतर हा आरोप झाला आहे.
भाजप नेत्यांची एक टीम कर्नाटकातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा शुक्रवारी आरोप केला होता. भाजपच्या कांही नेत्यांनी कॉंग्रेसच्या आमदारांची भेट घेऊन त्याना ५० कोटी रुपये व मंत्रिपदाचे अमिष दाखविल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला होता. यासंदर्भातील व्हिडिओ लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
प्रथमच आमदार रविकुमार गौडा यांचा हवाला देणारा एक मीडिया रिपोर्ट शेअर करताना असे म्हटले आहे की, भाजप नेत्यांची एक टीम पक्षविघातक ऑफर घेऊन आमदारांकडे जात आहे, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये भाजपला फटकारले.
“नेता किंवा अजेंडा नसलेला पक्ष…. लोकांचा जनादेश पूर्ववत करण्याची त्यांची जुनी सवय आहे,” असे ते म्हणाले.
“दिल्लीतील त्यांच्या मालकांच्या देखरेखीखाली, कर्नाटक भाजप आमच्या कर्नाटक सरकारला अस्थिर करण्याचा आणखी एक हास्यास्पद प्रयत्न करत आहे,” असा वेणुगोपाल यांनी आरोप केला.
“परंतु आमचे काँग्रेसचे आमदार कट्टर निष्ठावंत आहेत आणि या सरकारची हमी जलद पुरवल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. कदाचित त्यांनी आधी विरोधी पक्षनेता (एलओपी) आणि पक्षाध्यक्ष शोधायला हवा?” असे वेणुगोपाल म्हणाले.
गौडा यांनी शुक्रवारी आरोप केला की २०१९ मध्ये काँग्रेस-धजद युतीचे सरकार पडण्यामागे असलेली एक टीम आता काँग्रेस आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवण्याचे काम करत आहे आणि चार आमदारांशी आधीच संपर्क साधला गेला आहे.

सरकार अस्थीर करण्याचा प्रयत्न – सिध्दरामय्या
भाजपची एक टीम ‘ऑपरेशन कमल’ करत आहे. त्यांनी आधीच काही काँग्रेस आमदारांशी संपर्क साधला आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आमदार गनिगा रवीकुमार यांच्या आरोपावर प्रतिक्रीया देताना सांगितले.
ते म्हणाले की ‘मला ऑपरेशन कमल’बद्दल माहिती नाही’ हे मात्र खरे आहे की भाजप आमचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, त्यांनी काँग्रेसच्या किती आमदारांशी संपर्क साधला? त्यांनी त्याना काय सांगितले ते मला माहित नाही. परंतु आमचे सरकार अस्थिर करणे शक्य नाही.
काँग्रेस-धजद आघाडी सरकार पाडण्यास कारणीभुत असलेली टीम पुन्हा कामाला लागली आहे. सकाळी तयार होऊन ते काँग्रेस आमदाराच्या घरी जात आहेत. आम्ही विशेष लढा देऊ. मला ऑपरेशन कमलबद्दल माहिती नाही, मी रवी गनिगा यांच्याशी बोललो नाही. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आली होती. मात्र भाजपला ते करणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
असफल प्रयत्न – शिवकुमार
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, भाजपने काँग्रेस आमदारांना पैशांच्या ऑफर देण्यामागे मोठे षड्यंत्र आहे. मात्र त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. आम्हाला सगळ्यांच्या चाली माहीत आहेत. काही बडे लोकही षडयंत्र राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे कोणतेही प्रयत्न फलदायी ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta