Monday , September 21 2026
Breaking News

ध्वजस्तंभ लावताना विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात सध्या राज्योत्सवाची जोरदार तयारी सुरू असतानाच एक अतिशय धक्कादायक घटना घडली. ध्वजस्तंभ लावताना एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

बैलहोंगल तालुक्यातील वकुंड गावातील बसस्थानकासमोर ध्वजस्तंभ लावत असताना ही दुर्घटना घडली. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू होती. ध्वज लावत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

प्रज्वल चन्नेगौड (18) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *