कलबुर्गी : कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यातील हळ्ळोळ्ळी क्रॉसजवळ लॉरी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
नेपाळ वंशाच्या कुटुंबातील दोन मुलांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुधणीकडून येणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीने धडक दिली.
सर्व मृतक अफजलपूरमध्ये फास्ट फूड रेस्टॉरंट चालवत होते. मूळचे नेपाळचे असलेले हे कुटुंब अनेक वर्षांपासून अफझलपूर येथे वास्तव्यास होते. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta