मंड्या : मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर तालुक्यातील बनघट्टाजवळ मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता मोटारचालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार (कार) कालव्यात पडली. म्हैसूरकडून मोटार येत होती. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसू नये म्हणून कार वळवली आणि ती कालव्यात पडली.
चंद्रप्पा, धनंजय, कृष्णप्पा आणि जयन्ना या तिघांचे वय अंदाजे 40 ते 45 आणि बाबू, वय 25 अशी मृतांची नावे आहेत. ते मूळ भद्रावती येथील रहिवासी होते आणि म्हैसूरच्या बाहेरील भागात बिलीकेरे येथील हॉटेलमध्ये जेवण करून तुमकुरू जिल्ह्यातील तिप्तूर येथे जात होते. अग्निशमनचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मोटार बाहेर काढल्यानंतर मोटारीमधून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.
Belgaum Varta Belgaum Varta