उडुपी येथील घटनेने हळहळ
बंगळूर : संपूर्ण राज्यात दिवाळीचा सण सुरू असतानाच दूरच्या उडुपीमध्ये एक अमानुष कृत्य घडले आहे. मास्क घातलेल्या मारेकर्याने अचानक घरात घुसून एकाच कुटुंबातील चार जणांना चाकूने वार करून ठार केले आणि वृद्ध महिलेला गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला.
उडुपीमधील हम्पनकट्टेजवळील नेजारीच्या तृप्ती लेआउटमध्ये रविवारी ही घटना घडली.
एकाच कुटुंबातील चार जणांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची घटना उडुपी तालुक्यातील नेजारूजवळील तृप्ती नगरमध्ये घडली. आई आणि तीन मुलांची हत्या करून हल्लेखोर फरार झाला आहे.
हसीना (वय ४८), अफसान (वय २३), अयनाज (वय २०), असीम (वय १४) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. हसीनाच्या सासूला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चौघांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या हत्येमागचा हेतू तपासातून समोर येणार आहे. घरातून कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही. जिल्हा पोलिसप्रमुख अरुण म्हणाले की, सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.
ही घटना आज सकाळी साडेआठ वाजता घडली. ते मास्क घालून आले आणि अचानक घरात घुसले. प्रथम महिला आणि मुले हसिना, अफसान, ऐनाज यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. आवाज ऐकून खेळत असलेला असीम बाहेर येताच त्याच्यावरही चाकूने वार करण्यात आला.
आरडाओरडा ऐकून बाहेर आलेल्या शेजारच्या घरातील तरुणीला धमकावून त्यांनी तिथून हाकलून दिले. घरात असलेल्या सासूलाही किरकोळ दुखापत झाली आहे. नवरा परदेशात नोकरी करतो.
मालपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा पोलिसप्रमुख अरुण कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सभ्य कुटुंब
हसीनाचे कुटुंब गेल्या पन्नास वर्षांपासून तृप्ती नगरमध्ये राहत आहे. ते एक सभ्य कुटुंब होते आणि त्यांच्यात कधीही भांडण झाले नाही. त्यांच्या कुटुंबातील सदस्य जिव्हाळ्याने रहात होते. तिचा दुबईतला नवरा वेळोवेळी ये-जा करत असे. त्याचे कोणाशीही वैर नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta