Wednesday , March 4 2026
Breaking News

केएसआरटीसी अपघात नुकसान भरपाई तीन लाखांवरून दहा लाख रुपये

Spread the love

 

बंगळूर : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक जानेवारी २०२४ पासून अपघात मदत निधी ट्रस्टने द्यावयाची भरपाई तीन लाख रुपयांवरून दहा लाख रुपये केली आहे.
अपघातग्रस्तांच्या आश्रितांना अतिरिक्त भरपाई देण्यासाठी केएसआरटीसी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ५० ते ९९ रुपये आणि १०० रुपयांच्या तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून प्रत्येकी १ रुपये आणि त्यावरील तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून प्रत्येकी २ रुपये वसूल केले जातील, असे महामंडळाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
एक जानेवारी २०२४ पासून, रक्कम अपघात मदत निधी ट्रस्टमध्ये जमा केली जाईल. यापूर्वी १०० रुपये आणि त्यापेक्षा जास्त तिकीट मूल्य असलेल्या प्रवाशांनी मदत निधीसाठी एक रुपये जमा केले होते. त्याचप्रमाणे एक रुपये ते ४९ रुपये तिकीट मूल्य असलेल्या प्रवाशांकडून कोणत्याही अपघात नुकसान भरपाई निधीचे योगदान वसूल केले जाणार नाही, असे महामंडळाने एका निवेदनात म्हटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *