Wednesday , March 4 2026
Breaking News

शिवकुमार “पर्सन ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

शिवशंकरप्पा, संतोष लाड, गोविंदराजू यांना विशेष पुरस्कार

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रेस क्लब ऑफ बंगळुरच्या “पर्सन ऑफ द इयर-स्पेशल पर्सन” आणि वार्षिक पुरस्कार समारंभाचे उद्घाटन केले आणि प्रेस क्लब डायरी २०२४ चे प्रकाशन केले.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना “पर्सन ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री शामनुर शिवशंकरप्पा, कामगार मंत्री संतोष लाड, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव के. गोविंदराजू यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती शिवराज पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, संविधान हाच आपला धर्म आहे. राजकीय धर्माचे पालन करणे म्हणजे संविधानाला दिलेला आदर होय. प्रदीर्घ आणि अर्थपूर्ण चर्चेनंतर आपली ही राज्यघटना लागू करण्यात आली. त्यामुळे या संविधानाचा आदर करणे आणि त्याचे पालन करणे हे सर्व राजकीय पक्ष आणि व्यक्तींचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
वंचितांसाठी वकिली करणे, आवाजहीन, वस्तुनिष्ठपणे बातम्या देणे हे पत्रकारितेचे मूलभूत मूल्य आहे. या मूल्यांचे पालन करणे म्हणजे संविधानाला दिलेला आदर होय. याशिवाय माझ्या गाडीवर बसलेल्या कावळ्याची मोठी चर्चा केल्यानंतर अंधश्रध्देला प्रोत्साहन देण्याच्या पद्धतीने वागले, तसे वागू नका, असे त्यांनी सांगितले.
सरकार जे काही चुकीचे करत असेल ते सांगण्याची हिंमत पत्रकारांमध्ये असली पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी देशाच्या विकासाची चर्चा आणि स्वप्न होते. आता माध्यमे उद्योगपतींच्या हातात आहेत. उद्योजकांना सामाजिक चिंता नसते. याबाबत पत्रकारांनी काळजी घ्यावी.

मी राजकारणात, शिवकुमार संघटनेत पुढे – सिध्दरामय्या
डी.के. शिवकुमार हे संघटनात्मक कौशल्य असलेले सक्रिय व्यक्ती आहेत. पण माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी संघटनेत ते माझ्यापेक्षा पुढे आहेत. तुम्ही शिवकुमार यांची २०२३ सालची व्यक्ती म्हणून निवड केली आहे. एक व्यक्ती जे संघटनेत पारंगत आहेत. त्यांच्या आधी मी राजकारणात असलो तरी संघटनेत ते माझ्यापेक्षा पुढे आहेत. मी जनता पक्षाचा अध्यक्ष होतो. त्यांनी मला त्या पक्षातून काढून टाकले. अनेकांनी जनता दल सोडला, पण मी सोडला नव्हता. त्यांनीच मला बाहेर काढले. त्यामुळे अहवाल आणि विश्लेषण करताना मी धजद पक्ष सोडला असे लिहिणे योग्य नाही, असे त्यांनी माध्यमाना सुनावले.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *