Wednesday , March 4 2026
Breaking News

हमी योजनांच्या अंमलबजावणीसाठी समिती अध्यक्षाना मिळणार कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

Spread the love

 

बंगळूर : पाच हमी योजना जाहीर करून राज्यात सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार हमी योजनांवर अधिक भर देत आहे. आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी हमी योजनांच्या पुरेशा अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.
केपीसीसी कार्यालयात आज झालेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा प्रभारी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी समितीच्या स्थापनेची घोषणा केली.
हमी योजनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीच्या प्रदेशाध्यक्षांना कॅबिनेट दर्जा आणि पाच उपाध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पाच योजनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर समित्याही स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय अध्यक्षांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला जाईल. उर्वरित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना मानधन देण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी १६ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अलीकडेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिलांना मोफत बससेवा देणारी शक्ती योजना, गृहिणीला दोन हजार रुपये देणारी गृहलक्ष्मी योजना, ‘गृह ज्योती’ मोफत वीज योजना, अन्नभाग्य योजना आणि राज्य सरकारची पाचवी हमी ‘युवानिधी’ योजना सुरू केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *