Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक सरकार अयोध्येत उभारणार यात्री निवास

Spread the love

 

बेंगळुरू : अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे. येत्या 22 जानेवारी रोजी त्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे, त्यामुळे सर्वत्र राममय वातावरण आहे. देशभरातील अनेक भाविक 22 जानेवारी आणि इतर दिवशी दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहेत. याच भाविकांचा विचार करून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातून जाणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येत यात्री निवास उभारण्यात येणार आहे.
भारतवर्षाची अनेक वर्षांची इच्छा पूर्णात्वाकडे जात आहे. अयोध्येत भव्य असे श्री राम मंदिर बांधण्यात येत आहे. त्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी होणार आहे. प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जावे, ही अनेक भाविकांची इच्छा असते. कर्नाटकातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कर्नाटकातील सरकारने रामनूर-अयोध्या येथे कर्नाटक यात्री निवास उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या यात्री निवासमध्ये भाविकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असणार आहे. अयोध्येतील रामनूर येथे यात्री निवास बांधण्यासाठी कर्नाटक सरकारच्या धर्मादाय विभागाने उत्तर प्रदेश सरकारला पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ऑगस्ट 2023 मध्ये उत्तर प्रदेश सरकारला पत्र लिहून कर्नाटकातून अयोध्येत जाणाऱ्या भाविकासांठी शरयू नदीजवळ गेस्ट हाऊस बांधण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्याअगोदरही बी. एस. येडियुराप्पा यांनीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, कर्नाटकच्या पत्राला उत्तर प्रदेश सरकारच्या गृहनिर्माण संस्थेकडून सकारात्मक प्रतिसाद कळविण्यात आला आहे.

दरम्यान, अयोध्येत राम मंदिराजवळ शरयू नदीतीरी येत्या वर्षभरात कर्नाटक गेस्ट हाऊस बांधण्यात येणार आहे. त्याची तयारी वेगात सुरू आहे. तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून शरयू नदीजवळील 5 एकर जागेवर कर्नाटक सरकारकडून हे अतिथीगृह बांधण्यात येत आहे, असे कर्नाटकातील धर्मादाय विभागाकडून सांगण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *