Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटकात संक्रांतीच्या दिवशी अपघातांची मालिका; १५ जण ठार

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटक राज्यात संक्रमण सणाच्या दिवशी अपघातांची मालिका घडली. एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एकूण १४ जणांचा मृत्यू झाला.
विजयनगर, चामराजनगर, बंगळुरू, दावणगेरेसह विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांची मालिका घडली. दावणगेरे येथे बोलेरो वाहन पलटी झाल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चंदनकेरे येथील
नागराज (३८), गौतम (१७) आणि मंजुनाथ (४५) अशी मृतांची नावे आहेत.
चामराजनगर जिल्ह्यातील कोळ्ळेगल तालुक्यातील जिनकनहळ्ळीजवळ भात कापणी यंत्राच्या लॉरीला दुचाकीची धडक बसल्याने तीन जण जागीच ठार झाले. एका मुलाचा रुग्णालयात उपचाराशिवाय मृत्यू झाला. पल्या गावातील संतोष (३२), पत्नी सौम्या (२७) आणि मुलगी नित्यासाक्षी (४) यांचा मृत्यू झाला आहे. तर अभि हा ९ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.
बंदीपूर पार्क येथे पती-पत्नी आपल्या दोन मुलांसह बाईकवरून सफारी पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, विजयनगरमध्ये लॉरी पलटी होऊन चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. चिक्कबळ्ळापूर येथील पेरामचनहळ्ळीजवळ सरकारी बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मडिकेरे क्रॉसजवळ कार उलटल्याने एकाचा मृत्यू झाला.
बेंगळुरू येथे कार झाडाला धडकून कंपाऊंडला धडकल्याने कारमधील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हावेरी येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तुमकूर येथे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी राज्यात अपघातांची मालिका घडली असून त्यात जीवितहानी झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *