Wednesday , December 10 2025
Breaking News

भाजपच्या नुतन ३९ जिल्हाध्यक्षाची नियुक्ती

Spread the love

 

बेळगाव शहराध्यक्षपदी गीता सुतार, बेळगाव ग्रामीण अध्यक्षपदी सुभाष पाटील; चिक्कोडीच्या अध्यक्षपदी अप्पाजीगोळ यांची वर्णी

बंगळूर : राज्य भाजपने जिल्हा शाखासाठी नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी ३९ संघटनात्मक जिल्ह्यांसाठी अध्यक्षांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर अध्यक्षपदी गीता सुतार, बेळगाव ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुभाष पाटील, तर चिक्कोडीच्या अध्यक्षपदी सतीश अप्पाजीगोळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
रायचूर शहराचे आमदार डॉ. शिवराज पाटील आणि जयनगरचे आमदार सी. के. राममूर्ती यांचीही जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेश समन्वयक म्हणून एस. दत्तात्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप राज्य कार्यालय सचिव म्हणून लोकेश अंबेकल्लू यांची आणि सहसचिव म्हणून बीएच विश्वनाथ यांची नियुक्ती केली आहे. माजी आमदार एल. नागेंद्र, सी.एस. निरंजनकुमार आणि अरुणकुमार पुजार यांनाही जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे.

नुतन जिल्हाध्यक्ष
म्हैसूर शहर – एल. नागेंद्र, म्हैसूर ग्रामीण – एल. आर. महादेवस्वामी, चामराजनगर – सी. एस. निरंजनकुमार, मंड्या – इंद्रेश कुमार, हावेरी – अरुणकुमार पुजार, धारवाड ग्रामीण – निंगप्पा सुतगट्टी, बेळगाव शहर – गीता सुतार, बेळगाव ग्रामीण – सुभाष पाटील, चिक्कोडी – सतीश अप्पाजीगोळ, बागलकोट – शांतगौडा पाटील, विजापुर – आर. एस. पाटील, बिदर – सोमनाथ पाटील, दावणगेरे – राजशेखर, तुमकूर – एच. एस. रविशंकर (हेब्बाक), बंगळूर ग्रामीण – रामकृष्णप्पा, चिक्कबळ्ळापूर – रामलिंगप्पा, कोलार: डॉ. के. एन. वेणुगोपाल, बंगळूर उत्तर – एस. हरीश, बंगळूर मध्य – सप्तगिरीगौडा, बंगळूर दक्षिण – के. सी. राममूर्ती, रामनगर – आनंदस्वामी, मधुगिरी: बी. सी. हनुमंतेगौडा, चित्रदुर्ग – ए. मुरळी, विजयनगर – चन्नबसवनगौडा पाटील, बेळ्ळारी – अनिलकुमार मोका, रायचूर – डॉ. शिवराज पाटील, कोप्पळ – नवीन गुळगन्नावर, यादगिरी – अमीन रेड्डी, गुलबर्गा – ग्रामीण – शिवराज पाटील रद्देवारी, गुलबर्गा शहर – चंद्रकांत पाटील, गदग – राजू कुरडगी, हुबळी-धारवाड – तिप्पण मजगी, उत्तर कन्नड – एन. एस. हेगडे, शिमोगा – टी. डी. मेघराज, चिक्कमंगळूर – देवराज शेट्टी, उडुपी – किशोर कुंदापूर, दक्षिण कन्नड – सतीश कुंपल, कोडगू – रवी काळप्पा, हासन -सिद्धेश नागेंद्र
इतर महत्वाची पदे
राज्य समन्वयक: एस. दत्तात्री
प्रदेश कार्यालय सचिव : लोकेश आंबेकल्लू
राज्य कार्यालय सहसचिव : बी.एच. विश्वनाथ

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *