बेंगळूर : वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि राज्याच्या माहिती विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) पदी बढती देण्यात आली आहे. राज्य सरकारने गुरुवारी याबाबतचा आदेश जारी केला. मात्र पदोन्नतीनंतरही राज्याच्या माहिती विभाग आयुक्तपदाचा कार्यभार त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे.