बंगळूर : राज्यातील वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज दिलेली असतानाच, पुन्हा वीजेचे दर कमी करून वीज ग्राहकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. सरासरी १०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर आकारण्यात येणारे विजेचे दर कमी करण्यात आले आहेत. अशा ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटवर एक रुपये १० पैशांची कपात केली आहे.
त्याचप्रमाणे, १०० युनिटपेक्षा जास्त व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी, प्रति युनिट एक रुपये २५ पैशांनी कमी करण्यात आले आहे. रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना आकारण्यात येणारी वीज ४० पैसे प्रति युनिटने कमी करण्यात आली आहे, तर खासगी सिंचन वापरकर्त्यांसाठी दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. नवीन दर एक मार्चपासून १०० पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्यांसाठीच लागू होईल.
वीज दर कपातीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
एलटी डोमेस्टिक लाइटिंग – १०० युनिटपेक्षा जास्त वापरासाठी प्रति युनिट ११० पैसे कमी.
एचटी (व्यावसायिक) – प्रति युनिट १.२५ पैसे कमी.
एचटी इंडस्ट्रियल – प्रति युनिट ५० पैसे कपात.
एचटी हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था – प्रति युनिट ४० पैसे कपात.
एचटी खासगी स्तरीय सिंचन – २०० पैसे प्रति युनिट कमी.