
बंगळुरू : बंगळूरमधील राजाजीनगर येथील रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट झाला आहेत. यात किमान ४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बंगळूरच्या व्हाईटफील्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. या स्फोटातील जखमींमध्ये तीन कर्मचारी आणि एका ग्राहकाचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास एका पिशवीत ठेवलेल्या वस्तूचा स्फोट झाला आहे.
रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटानंतर व्हाईटफिल्ड क्षेत्राचे पोलिस उपायुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे ठिकाण बंगळूरमधील सर्वात प्रसिद्ध हॉटेलपैकी एक आहे.
“आम्हाला रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाल्याचा कॉल आला होता. आम्ही घटनास्थळी धाव घेतली आणि आम्ही तिथली परिस्थिती पाहिली. बचावकार्य सुरु आहे.” असे व्हाईटफील्डच्या अग्निशमन केंद्राने म्हटले आहे.
हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी स्फोटाचा तपास सुरू केला असून या परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta