
बेंगळुरू : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे. यानंतर आपणावर झालेल्या आरोपासंदर्भात माध्यमांशी बोलताना येडियुराप्पा म्हणाले, एक महिला आपल्या मुलीसमवेत माझ्या घरी आली होती. रडत आलेल्या महिलेकडून त्यावेळी मी त्यांच्याकडून त्यांची तक्रार ऐकून घेतली. त्यांच्यावर झालेल्या अन्यायप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच, त्या दोघीजणी माझ्या विरोधातच बोलायला लागल्या. यावेळी मला त्यांची मानसिक स्थिती ठीक आहे का की नाही अशी शंका आली. तरीही मी पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्याय संदर्भात चौकशीची सूचना केली. स्वतःकडील पैसे देऊन त्यांना रवाना केले. मात्र आता त्यांनीच माझ्यावर पोस्कोअंतर्गत पोलीस तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारचा आरोप आपणावर होईल याची मला सुतराम कल्पना नव्हती. मात्र आपणावर झालेल्या आरोपाची योग्य प्रकारे चौकशी होईलच. आपण उपकार करायला गेलो आणि त्याच्या बदल्यात आरोप झाले याचे आश्चर्य वाटत असल्याचेही येडियुराप्पा यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta