निपाणी (वार्ता) : शहरातील जत्राटवेस येथे नगरपालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेतर्फे काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा प्रचार करण्यात आला. प्रारंभी माजी नगराध्यक्ष विजय शेटके, चंद्रकांत जासूद, राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते मातंगी देवीची पूजा करण्यात आली.
नगरसेवक रवी श्रीखंडे यांनी स्वागत केले.
यावेळी झालेल्या सभेत माजी सभापती किरण कोकरे, माजी नगराध्यक्ष गजेंद्र पोळ, माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी, माजी नगरसेवक रियाज बागवान, अशोक लाखे, युवराज पोळ, किसन दावणे यांनी मनोगतातून प्रियांका जारकीहोळी यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
प्रचारफेरीत माजी सभापती अल्लाबक्ष बागवान, विश्वास पाटील, दिलीप जाधव, शशिकांत चडचाळे, मुकुंद रावण, धनाजी निर्मळे, बबन चौगुले, शरीफ बेपारी, सुनील गाडीवड्डर, प्रकाश पोटजाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जीवन घस्ते यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta