Friday , September 20 2024
Breaking News

मुलानेच दिली हत्येची सुपारी; 8 आरोपींना अटक

Spread the love

 

गदग : गदग येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून मुलासह आठ आरोपींना अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी गदग नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा सुनंदा बाकळे यांचा मुलगा कार्तिकसह एकाच कुटुंबातील चौघांच्या खून प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. घटनेच्या 48 तासांत पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. या खुनासाठी मुलाने सुपारी दिल्याचा खुलासाही त्यांनी केला.
पोलिसांनी मुख्य आरोपी विनायक बाकळे, फैरोज काझी, साहिल, सोहेल, सुलतान शेखर, जिशान काझी, महेश साळोंके, वाहिद बेपारी यांच्यासह एकूण 8 आरोपींना अटक केली आहे.
सुनंदा बाकळे यांचे पती प्रकाश बकाळे यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा विनायक बाकळे याने भावाच्या हत्येची सुपारी देऊन हत्या केली. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर प्रकाश बाकळे यांनी सुनंदासोबत लग्न केले. विनायक बाकळे यांच्या नावावर अनेक मालमत्ता होत्या. विनायकने काही मालमत्ता प्रकाश बाकळे यांना न सांगता विकली होती. ही बाब समजताच प्रकाश बाकळे यांनी मुलगा विनायक याच्याकडे चौकशी केली. नेहमीच दोघांमध्ये भांडण होत होतं. या वागण्याने विनायक खूप नाराज झाल्याचे दिसते. या कारणावरून विनायक बाकळे याने कार्तिक बाकळे याला ठार मारण्याचा कट रचून सुपारी दिली. सुपारीची रक्कम 60 लाख ठरली आणि आगाऊ 2 लाख दिले. कार्तिकचा साखरपुडा होत असताना मारेकऱ्यांनी कार्तिकसह चार जणांची घरातच हत्या केली. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

भाजप आमदार मुनीरत्न यांना कोलार येथे अटक

Spread the love  दोन एफआयआर दाखल; छळ, लाच, जातीवाचक शिवीगाळचा आरोप बंगळूर : कंत्राटदाराच्या जीवाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *