Monday , September 21 2026
Breaking News

नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार

Spread the love

 

शिमोगा : हुबळीची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

याबाबत शिमोगा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, नेहाच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार असून आम्ही या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिरेमठ हिची हुबळी येथील बीव्हीबी कॉलेज परिसरात भरदिवसा चाकूने 10 वार करून हत्या करण्यात आली. घटनेनंतर तासाभरातच विद्यानगर पोलिसांनी मारेकरी फयाजला अटक केली. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *