Monday , September 21 2026
Breaking News

निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारार्थ उद्या खानापूरात भव्य प्रचार फेरी

Spread the love

 

खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी भव्य प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. यावेळी समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
सरदेसाई यांच्या प्रचार कार्यालयापासून दुपारी तीन वाजता फेरीला सुरुवात होणार असून शिवस्मारक, स्टेशन रोड, निंगापूर गल्ली- घोडे गल्ली, देसाई गल्ली, विठोबा देव गल्ली, गुरव गल्ली, पारिश्वाड रोड आदी भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर वाल्मिकी चौक येथे फेरीची सांगता झाल्यानंतर सभा घेतली जाणार आहे.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी आदिनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *