बेंगळुरू : महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी असलेले आमदार एच. डी. रेवण्णा यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
अटकेचा धोका असलेले आमदार एच. डी. रेवण्णा यांनी बंगळुरूच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.
महिलांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी पीडित महिलांनी रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध होलेनरसीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे आणि एचडी रेवण्णा यांना सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र रेवण्णा सुनावणीला हजर न राहिल्याचे सांगण्यात येत आहे.