बंगळूर : पुढील वर्षापासून दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षेत ग्रेस मार्क देण्याची पध्दत रद्द करण्याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
विधानसौध येथे मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षी विद्यार्थ्यांना २० ग्रेस गुण दिले आहेत. कोणत्या कारणासाठी आणि हेतूने ग्रेस मार्क्स दिले आहेत. तुम्हाला ग्रेस मार्क्स देण्यास कोणी सांगितले, असा सवाल अधिकाऱ्यांना केला.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण विभागाने उत्तिर्णतेसाठी किमान गुण ३५ वरून २५ वर आणले आहेत. मात्र, निकालाचे प्रमाण कमी होणे चिंतेचे कारण बनले आहे. यावेळी १.७० लाख विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले आहेत. ग्रेस मार्क्स दिले नसते तर इतके विद्यार्थी नापास झाले असते आणि निकाल आणखी घसरला असता, असे बोलले जात आहे. सरकारने पुढील वर्षापासून ग्रेस मार्क्स रद्द करण्याचे सुचवले आहे.