बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगावातील टीजेएसबी बँकेतर्फे महिला विद्यालयात बुधवार दि. ३० रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने बँकेतर्फे विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.
यामध्ये बँकेचे सर्व कर्मचारी आणि विद्यालयाचे शिक्षक, मुख्याध्यापिका आदी सहभागी झाले होते. शाळेच्या आवारात विविध रोपे लावण्यात आली. त्यांचे संवर्धन करणार असल्याची ग्वाही शिक्षकवृंदाने दिली.
बँकेचे शाखाधिकारी राजेश जाधव यांनी मुख्याध्यापिका कविता परमाणिक यांना रोप देऊन उपक्रमाचा प्रारंभ केला. सर्व सहभागी झालेल्यांनी आवारात रोपे लावली.
Belgaum Varta Belgaum Varta