
बेळगाव : पावसाळ्यात सेवा बजावताना पोलिसांना त्रास होवू नये म्हणून युनिव्हर्सल ग्रुपतर्फे खडेबाजार पोलिसांना रेन सुटचे वितरण करण्यात आले.
आपल्या विविध उत्पादनाने ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या युनिव्हर्सल ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून खडेबाजार पोलीस स्थानकातील पोलीस आणि अधिकाऱ्यांना रेन सूटचे वितरण केले.
सध्या कोरोना संक्रमण सुरू असून पोलिसांवर नेहमीपेक्षा कामाचा ताण आहे. आता पावसाला सुरुवात होणार असून सेवा बजावताना पोलिसांना त्रास होवू नये या उद्देशाने युनिव्हर्सल ग्रुपतर्फे शंभर दर्जेदार रेन सूटचे खडेबाजार पोलीस स्थानकाच्या आवारात श्रेयकर बंधूंच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी किशोर श्रेयकर यांनी पोलीस खाते बजावत असलेल्या सेवेचे कौतुक करून पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून युनिव्हर्सल ग्रुपतर्फे रेन सूट वितरित करण्यात आल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी खडेबाजार उप विभागाचे एसीपी चंद्रप्पा, खडेबाजार सीपीआय धीरज शिंदे, युनिव्हर्सल ग्रुपचे रवी, किशोर, विवेक, विनायक, यशवंत श्रेयकर आणि कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta