Thursday , November 21 2024
Breaking News

LOCAL NEWS

मुख्यमंत्री सिध्दरामय्या उद्या दिल्ली भेटीवर

  काँग्रेस हायकमांडशी करणार चर्चा; नंदिनी दूध उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दिल्लीला रवाना होत असून उद्या (ता. २१) ते काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करणार आहेत. कर्नाटक दूध महामंडळ (केएमएफ)च्या दिल्लीतील दूध दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धमय्या आज संध्याकाळी दिल्लीला रवाना …

Read More »

ग्रामीण भागात मराठी संस्कृती जपण्याची गरज : आर. एम. चौगुले

  सावगाव येथे युवा आघाडीतर्फे नृत्य स्पर्धा बेळगाव : ग्रामीण भागातील लोककला जपायची असल्यास प्रथम मराठी भाषा आणि संस्कृती टिकली पाहिजेत. त्यामुळे मराठी भाषेसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी मराठी भाषिकांनी पाठबळ देणे काळाची गरज आहे. तसेच विविध प्रलोभने दाखवणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या नादी न लागता मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी समितीसोबत …

Read More »

बेळगावात ‘वक्फ’साठी शांततेत मतदान

  बेळगाव : अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यातील वक्फ बोर्डाच्या निवडणुका बेळगावात शांततेत पार पडल्या. बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात वक्फ निवडणुकीसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उपविभागीय अधिकारी श्रावण नाईक, उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव, बेंगळुरू, म्हैसूर आणि गुलबर्गासह राज्यातील चार विभागांमध्ये …

Read More »

रेल्वे रुळावर झोकून देऊन अनोळखीची आत्महत्या

  बेळगाव : बेळगाव येथे रेल्वे रुळावर झोकून देऊन अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बेळगाव शहरातील किल्ला तलावाच्या मागील भागात असलेल्या रेल्वे रुळावर मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. दादरहून हुबळीकडे जाणाऱ्या लोकमान्य एक्सप्रेस रेल्वेखाली झोकून देऊन अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केली. त्यानंतर मागून येणाऱ्या मिरज रेल्वेच्या चालकाने मृतदेह …

Read More »

9 ते 20 डिसेंबर दरम्यान कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन

बेळगाव : येत्या 9 ते 20 डिसेंबर दरम्यान सुवर्ण विधान सौध येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. अधिवेशन बोलावण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे पाठवण्यात आल्याची पुष्टी कायदा आणि संसदीय कामकाज मंत्रालयाने केली आहे. एक ऐतिहासिक टप्पा म्हणून यंदा सरकार गत 26 व 27 …

Read More »

बिम्समधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळंतीण महिलेचा मृत्यू

बेळगाव : बिम्स डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्हा रुग्णालयात घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील नागनूर तांडा येथील कल्पना राठोड या मृत महिलेचे नाव आहे. काल रात्री तिने शस्त्रक्रियेद्वारे मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ निरोगी असून कोणतीही अडचण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मात्र मंगळवारी सकाळी …

Read More »

आर. एम. चौगुले यांनी केले विजेत्या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत

  मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगाव विजेता बेळगाव : बंगळूर येथे सुरू असलेल्या मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगावातील मुलांच्या संघाने अंतिम फेरीत म्हैसूरला नमवित विजेतेपद पटकाविले. या संघाचे आगमन बेळगाव रेल्वेस्थानकावर होताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. उपस्थित सर्व खेळाडूंना गुलाबपुष्प आणि …

Read More »

विश्वेश्वरय्या नगर परिसरात चोरीच्या प्रकारात वाढ

    बेळगाव : बेळगाव शहरात दिवसेंदिवस खून, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विश्वेश्वरय्या नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसतिगृहात एकाच महिन्यात पाच घरफोड्या झाल्या असून, स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या महिनाभरात चोरीच्या पाच घटना उघडकीस आल्या आहेत. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरील घरातून अशा घटना घडल्या तर सामान्य जनतेच्या घरांचे …

Read More »

खादरवाडी गावच्या जमीन प्रकरणाला नवी कलाटणी

  बेळगाव : खादरवाडी गावच्या जमीन प्रकरणाला आता नवी कलाटणी आली आहे. खादरवाडी गावच्या शेतकऱ्यांनी काल गावात निषेध मोर्चा, निदर्शने केल्यामुळे जमीन विकणाऱ्या काही दलाल सदस्यांनी बैठकीमध्ये संपूर्ण गावांसमोर आपले म्हणणे मांडले. यामध्ये त्यांनी हा व्यवहार व या व्यवहाराची रक्कम बुडा कमिशनरने ठरविल्याचे धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे या खादरवाडीच्या …

Read More »

समिती कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणा; सापडलेले पाकीट मूळ मालकाला परत

  बेळगाव : तिसरे रेल्वे गेट येथील ओव्हर ब्रिजवरील रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकीट भारतनगर, शहापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीधर खन्नूकर यांनी प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत केल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. याबाबतची थोडक्यात माहिती अशी, एस. एम. खन्नूकर असोसिएट्सचे श्रीधर मोनाप्पा खन्नूकर हे आज दुपारी आपली सर्व्हिसिंगला …

Read More »