देवेंद्र फडणवीस बांदोडकरांसह पर्रीकरांच्या आठवणीत भाऊक, म्हणाले..
ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल गोव्यात येेऊन खोटं बोलतात; देवेंद्र फडणवीस
पणजी -गेल्या 10 वर्षात भाजप सरकारने जे काम केल ते उल्लेखनीय आहे. त्यात मनोहर पर्रीकरांचा (Manohar Parrikar) मोठा वाटा आहे. भाऊसाहेब बांदोडकर (bhausaheb bandodkar) यांच्यानंतर गोवा कोणाला लक्षात ठेवत असेल तर ते नाव आहे मनोहर पर्रीकर. त्यांनी सामान्य जनतेसाठी काम केल. भाजप सरकारने मनोहर पर्रीकरांपासून ते प्रमोद सावंत यांच्या कारकिर्दीत गोव्याचा चेहरा बदलला आहे. गोव्याला आधुनिक रूप दिल, त्यानुसार अनेक मोठे व्यवसाय आणले, रस्त्यांची निर्मिती केली. यासोबतच पारदर्शक काम करून सामान्य जनतेचा पैसा सामान्य जनतेच्या हितासाठी वापरला. अस मत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मांडले.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेसवर (Congress) देखील सडकून टीका केली. ते म्हणाले की गोव्याने कॉंग्रेसच देखील सरकार पाहिल आहे. त्यांच्याकडे कोणतही काम जनतेला दाखवण्यासारख नाही. तसेच गोव्यात बाहेरून अनेक पक्ष दाखल होत आहेत. आम्ही गोव्याच्या (goa) जनतेला हे देऊ ते देऊ अशी आश्वासन देत आहेत. मात्र ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या राज्यात यातली एकही गोष्ट दिलेली नाही. हे नेते गोव्यात येतात आणि रोज खोट बोलतात, अस म्हणत फडणविसांनी खरपूस समाचार घेतला.
याउलट भाजपने गोव्यात वयोवृद्धांना आणि विधवा महिलांना पेन्शनची स्कीम सुरू केली तसेच मुलींसाठी स्कीम सुरू केली यासोबतच हेल्थ स्कीम देखील गोव्यात भाजपने (BJP) सुरू केली आहे, याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.