शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं 81व्या वर्षी निधन
मुंबई: ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते. सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, असं मानलं जातं. शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. ते शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते.
त्यांनी मुंबईचा महापौर ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी भूषवले होते. आजारपणामुळे त्यांनी १९९९ मध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनातही दिसत नव्हते.