Sunday , September 8 2024
Breaking News

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी भडकले

Spread the love

नवी दिल्‍ली : महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्‍य जनतेला सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका दिला. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कंपन्यांनी २५.५० रुपयांची वाढ केली. दुसरीकडे १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील घरगुती सिलिंडरचे ८३४ रुपयांवर गेले आहेत.

तेल कंपन्यांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जात आहे. त्यापाठोपाठ आता घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढविण्यात आल्याने सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणावर प्रभावित होणार आहेत. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दिल्लीतील दर ८३४ रुपयांवर गेले असून मुंबईत हेच दर ८३४.५ रुपये, कोलकाता येथे ८६१ रुपये तर चेन्नई येथे ८५० रुपयांवर गेले आहेत.

१९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचे दिल्लीतील दर वाढून १५५० रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे हेच दर१६५१.१ रुपयांवर तर मुंबई आणि कोलकाता येथे हे दर क्रमशः १५०७ आणि १६८७.५ रुपयांवर गेले आहेत. जून महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. दुसरीकडे व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर १२३ रुपयांनी वाढविण्यात आले होते.

About Belgaum Varta

Check Also

सिक्कीममध्ये सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळून ४ जवानांचा जागीच मृत्यू

Spread the love  नवी दिल्ली : सिक्कीमध्ये गुरुवारी भारतीय सैन्य दलाचे वाहन ७०० ते ८०० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *