Sunday , September 8 2024
Breaking News

अतिथी प्राध्यापकांचे खानापूर तहसीलदारांना निवेदन

Spread the love

खानापूर (वार्ता) : कर्नाटक राज्यातील पदवी महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून गेली कित्येक वर्षे अत्यंत कमी पगारात सेवा बजावत आहेत. खानापूर शहरातील सरकारी पदवी महाविद्यालय तसेच बिडी येथील पदवी महाविद्यालय येथे अनेक प्राध्यापक कमी पगारात सेवा बजावत आहेत. कमी पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेव्हा अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करून घ्यावे, या मागणीसाठी खानापूर व बिडी येथील पदवी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी तहसीलदार कार्यालयाचे उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना निवेदन देऊन आपली समस्या मांडली.
निवेदनात म्हटले आहे की, सरकारी पदवी महाविद्यालयात अत्यंत कमी पगारात लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. केवळ पाच ते सहा महिने काम दिले जाते. वर्षभर खाली राहावे लागते. तेव्हा सेवेत कायम करून घ्यावेत. अन्यथा अतिथी प्राध्यापक बहिष्कार घालून धरणे सत्याग्रह करू असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे निवेदन पाठवू न्याय देऊ असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
निवदेन देताना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मबनुर, उपाध्यक्ष जयश्री हंचिनमनी, कार्यदर्शी के. एस. कांबळे, खजिननदार विठ्ठल सोनपनावर, सदस्य पी. पी. पाटील, टी. ए. हुलीकट्टी, स्नेहा हिरेमठ, अर्चना कटगलकर, दीपा अंगडी, राजश्री अवरडी, सरला देसाई, चिदानंद कांबळे, डॉ. प्रविण पाटील, डॉ. गीता काजी, आदी जवळपास 28 अतिथी प्राध्यापक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

Spread the love    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *