Sunday , September 8 2024
Breaking News

शिवाजी पार्कमध्ये अश्वारुढ शिवाजी महाराज पुतळा उभारणार

Spread the love

युवा नेते उत्तम पाटील : बोरगावमध्ये जिजाऊ जयंती
निपाणी (वार्ता) : बोरगाव शहराच्या सौंदर्यात भर पडताना नियोजित छत्रपती शिवाजी पार्क याचे सुशोभीकरण करण्यासाठी नगरपंचायतकडून अनुदान मंजूर झाले आहे. सध्या याचे काम प्रारंभ झाले असून लवकरच या ठिकाणी आपणासह अरिहंत उद्योग समूह व नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातून अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याची ग्वाही युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. बोरगाव येथील नियोजित शिवाजी पार्क येथे मराठा समाज व जिजामाता महिला संघ यांच्यावतीने आयोजित राजमाता जिजाऊ जयंती प्रसंगी उत्तम पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, प्रत्येकाने राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी यांचे तत्व व संस्कारांचे अनुकरण करावे. फक्त जयंती दिवशी यांचे प्रतिमा पूजन करायचे व नंतर विसरायचे असे न होता प्रत्येक दिवस आपण त्यांनी घालून दिलेल्या आचार विचारावरचालणे महत्त्वाचे आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आपणही आपल्या समाजातील रूढी परंपरा जिवंत ठेवून संस्कार व संस्कृतीला महत्त्व दिल्यास खर्‍या अर्थाने त्यांची जयंती साजरी केल्यासारखे होईल.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्राचार्य प्रकाश कदम यांनी, कुटुंबातील कमी होत चाललेला संवाद वाढण गरजेचे आहे. समाजात ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत. पण वय झाले की आपण एकटे आहोत, ही भावना न ठेवता समाजापासून दूर राहू नका. युद्धाच्या दुनियेत कुटुंबातील व्यक्ती एकत्र राहिले पाहिजेत. वृद्धापकाळात हसतमुखाने सामोरे जाणे गरजेचे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मराठा समाजाच्या वतीने युवा नेते उत्तम पाटील व धनश्री पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. समाजाचे ज्येष्ठ नेते आण्णासो पवार, मारुती निकम, मल्ला मनगुत्ते, विजय वास्कर, एस. बी. पाटील, बाळासाहेब सातपुते, महादेव उलपे, नरसू गोटखिंडे, बबन रेंदाळे, शिवाजी कदम, शिवाजी तोडकर, प्रकाश कदम, गीता घाटगे, अण्णाप्पा ढोंगे, अनिल गुरव, चंदू पवार, अशोक डकरे, संजय पवार, सरेखा घाळे, वर्षा मनगुत्ते, राजू शिरोळे, उल्हास निकम, उमेश वास्कर, शिशिर सातपुते, यांच्यासह जिजामाता महिला संघाच्या कार्यकर्त्या मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *