Sunday , September 8 2024
Breaking News

सैनिकी शाळेमध्ये अंकित उपाध्ये यांचा सत्कार

Spread the love


कोगनोळी : इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज कोगनोळी या सैनिकी निवासी संकुलामध्ये डॉक्टर अंकित उपाध्ये यांचा सत्कार केला. त्यांनी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ज्योतिष शास्त्रामध्ये पीएचडी तसेच ज्योतिष शास्त्र विशारद म्हणून नाव लौकिक मिळवल्याबद्दल संकुलाच्या अध्यक्षा रेखा पाटील व संस्थेचे सचिव कुमार पाटील यांच्या अमृत हस्ते सत्कार केला.
यावेळी अंकित उपाध्ये यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संकुलाकडून मिळणारे शिक्षण, संस्कार, शिस्त व सैन्य प्रशिक्षण दर्जेदार असून हे आपल्या भावी आयुष्यासाठी आदर्शवत व मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच विद्यार्थिदशेमध्ये स्वप्नांचा पाठलाग केला तर यश नक्कीच मिळते असा आत्मविश्वास देखील त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
यावेळी संकुलाच्या अध्यक्षा रेखा पाटील यांनी अंकित उपाध्ये यांनी कमी वयामध्ये मिळवलेले यश हे कौतुकास्पद असून आपण देखील असा आदर्श घेऊन शिक्षण घ्यावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल पाटील, संचालिका कोमल पाटील, तुषार पवार, संदीप कुराडे, अभय नवाळे, प्रबुद्ध कांबळे, सरिता दिवटे, वर्षा कांबळे, रुपादेवी ढेरे, मनीषा मडिवाळ यांच्यासह इतर शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन लखन जगताप यांनी तर आभार सागर दबडे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *