Wednesday , December 4 2024
Breaking News

अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अपात्रता याचिकाही नार्वेकरांनी फेटाळली!

Spread the love

 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. विधीमंडळ पक्षात बहुमत कुणाचं या एकमेव निकष महत्त्वाचं आहे, असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणात निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितलं.

राहुल नार्वेकर काय म्हणाले?
मी माझे मत मांडण्यास सुरुवात करत आहे. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र तो गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे.

शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचीच आहे.

अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही, असा दावा दोन्ही गटाकडून कऱण्यात आला. 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं. पण 30 जून 2023 रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा

आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत. पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही.

शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शिवशाही बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी ठार

Spread the love  गोंदिया : शिवशाही बस उलटून १५ प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *