Thursday , September 19 2024
Breaking News

ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटून 7 मुलं, 8 महिलांसह 15 जणांचा मृत्यू

Spread the love

 

भीषण अपघाताने यूपी हादरली
लखनऊ : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी होऊन भीषण दुर्घटना घडली. या मोठ्या दुर्घटनेत 7 मुलांसह तब्बल 15 भाविकांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी हा हादरवून सोडणारा अपघात झाला. ट्रॅक्टरचालकाचं नियंत्रण सुटल्याने, ट्रॅक्टर थेट तलावात जाऊन पलटी झाला. त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. माघी पौर्णिमेनिमित्त ट्रॅक्टरमध्ये भरुन सर्व भाविक गंगा स्नानासाठी जात होते. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत 40 पेक्षा जास्त भाविक बसले होते. भरगच्च ट्रॉली थेट तलावात पलटी झाला. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत.

दरम्यान जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. तर घटनास्थळावरुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सध्या मदत आणि बचावकार्य सुरु असून, प्रशासनाने या घटनेची गंभीरतेने दखल घेतली आहे.

मृतांमध्ये 8 महिला आणि 7 मुलांचा समावेश
दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 8 महिला आणि 7 मुलांचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही भाविकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त
या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. तसंच जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *