Sunday , September 8 2024
Breaking News

गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी विजय

Spread the love

 

आयपीएल २०२४ मधील ३७ वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात गुजरातने पंजाबचा ३ विकेट्सनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील आपला चौथा विजय नोंदवला. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १४३ धावांचे लक्ष्य दिले होते, जे गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर १४७ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला. गुजरातसाठी राहुल तेवतीयाने १८ चेंडूत नाबाद ३६ धावा करत विजयात सर्वाधिक धावांचे योगदान दिले.

गुजरातने मागील पराभवाचा घेतला बदला
या विजयासह गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जविरुद्धच्या मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. त्याचबरोबर आता त्यांत्या खात्यात ८ गुण झाले असून सहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जची चार गुणांसह नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. गुजरातच्या या विजयात राहुल तेवतियाचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने ३६ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने या खेळी दरम्यान १८ चेंडूचा सामना करताना ७ चौकार मारले.

पंजाबने दिलेल्या १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली होती. साहा आणि गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी झाली. अर्शदीप सिंगने संघाला पहिला धक्का दिला. त्याने साहाला बाद केले. तो १३ धावा करण्यात यशस्वी झाला. तर गिल ३५ धावा करून परतला. या सामन्यात साई सुदर्शनने ३१ धावा केल्या. तर डेव्हिड मिलर चार धावा, अजमतुल्ला उमरझाई १३ धावा आणि शाहरुख खान तीन धावा करून बाद झाला. साई किशोर खाते न उघडता नाबाद राहिला. पंजाबकडून हर्षल पटेलने तीन तर लियाम लिव्हिंगस्टोनने दोन गडी बाद केले. त्याचवेळी अर्शदीप सिंग आणि सॅम करन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

राहुल तेवतिया हा गेम चेंजर ठरला
गुजरात टायटन्स संघ अडचणीत आला होता, त्यावेळी सहाव्या क्रमांकावर राहुल तेवतिया फलंदाजीला आला. त्याने सुरुवातीला संयमाने फलंदाजी केली आणि डावाच्या १८ व्या षटकात ३ चौकार आणि एका षटकारासह २० धावा करून सामना आपल्या बाजून वळवला. तेवतियाने कठीण परिस्थितीत १८ चेंडूत ३६ धावांची तुफानी खेळी करत गुजरात टायटन्सचा ३ गडी राखून विजय निश्चित केला.

About Belgaum Varta

Check Also

कुस्तीमध्ये अमन सेहरावतने जिंकले कांस्य पदक

Spread the love  पॅरिस : भारताच्या २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *