निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शंभू कल्लोळकर यांनी रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या निपाणी येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विषयावर चर्चा झाली.
प्रारंभी शंभू कल्लोळकर यांचा राजू पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कल्लोळकर म्हणाले, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात प्रत्येक वेळच्या निवडणुकीत घराणेशाही निर्माण झाली आहे. ती मोडीत काढण्यासाठी आपण विधानसभेनंतर आता लोकसभेसाठी रिंगणात उभे आहोत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असूनही त्याकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उभे आहोत. त्यासाठी रयत संघटनेने सहकार्य करण्याचे आवाहन केले.
राजू पोवार यांनी, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पण आज तागायत भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्यकर्त्यांनी काम करावे. लवकरच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या बाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी मधुकर पाटील, नितीन कानडे, शिवाजी वाडेकर, बाळासाहेब थोरात, बबन जामदार, शिवाजी माने, उमेश भरमाल, कलगोंडा कोटगे, बाबासो पाटील, एकनाथ सादळकर, सागर पाटील, रोहन नलवडे, शरद भोसले, चिनू कुळवमोडे, संजय नाईक, महादेव शेळके, नामदेव साळुंखे, विश्वास नलवडे, पंकज गाडीवडर, हिटलर माळगे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.