Friday , October 18 2024
Breaking News

दसरा उत्सवासाठी बेंगळुरू-बेळगाव स्पेशल ट्रेन

Spread the love

 

बेंगळुरू : दसरा उत्सवाची पार्श्वभूमी दक्षिण पश्चिम रेल्वेने बंगळुरू, म्हैसूर, हुबळी, बेळगाव या मार्गावर ४ विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती दिली आहे.
सध्याच्या वीकेंडमध्ये दसरा सणासाठी अनेक लोक बंगळुरूहून वेगवेगळ्या शहरात जातात. प्रवाशांची वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यशवंतपूर-बेळगाव एक्सप्रेस

गाडी क्रमांक ०७३०६ यशवंतपूर-बेळगाव एक्सप्रेस विशेष गाडी यशवंतपूर येथून १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता बेळगाव येथे पोहोचेल. हा मार्ग तुमकूर, टिपतूर, अरसेकेरे, बिरूर, दावणगेरे, हरिहर, राणीबेन्नूर, हावेरी, एसएसएस हुबळी, धारवाड, अळनावर, लोंढा आणि खानापूर स्थानकावर थांबेल.

बेळगाव-म्हैसूर एक्सप्रेस

गाडी क्रमांक ०७३०७ बेळगाव – म्हैसूर एक्सप्रेस विशेष गाडी बेळगावहून ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:२५ वाजता म्हैसूरला पोहोचेल. हा मार्ग खानापुर, लोंढा, अळनावर, धारवाड, एसएसएस हुबळी, हावेरी, राणीबेन्नूर, हरिहर, दावणगेरे, बिरूर, अरसेकेरे, हसन, होले नरसीपूर आणि कृष्णराजनगर स्थानकावर थांबेल.

हुबळी-यशवंतपूर एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक ०७३०५ एसएसएस हुबली – यशवंतपूर एक्सप्रेस विशेष ट्रेन एसएसएस हुबळी येथून १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७.४० वाजता यशवंतपूरला पोहोचेल. हावेरी, राणीबेन्नूर, हरिहर, दावणगेरे, बिरूर, अरसेकेरे, टिपतूर आणि तुमकूर स्थानकावर थांबेल.

म्हैसूर हुबळी एक्सप्रेस

ट्रेन क्र. ०७३०८ म्हैसूर – एसएसएस हुबळी एक्सप्रेस स्पेशल ट्रेन १२ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता म्हैसूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०० वाजता एसएसएस हुबळीला पोहोचेल. हा मार्ग कृष्णराजनगर, होले नरसीपुरा, हसन, अरसेकेरे, बिरूर, दावणगेरे, हरिहर, राणीबेन्नूर आणि हावेरी स्थानकांवर थांबेल.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी : पावसाच्या सरीतच ‘बाप्पां’च्या आगमनाची तयारी

Spread the love  बाजारपेठेत सजावट साहित्यासह, फळे खरेदीसाठी गर्दी निपाणी (वार्ता) : लाडक्या गणपतीबाप्पांच्या आगमनासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *