Friday , April 25 2025
Breaking News

आजरा : साखर कारखाना बेअरिंग चोरी प्रकरणी पाचजण ताब्यात

Spread the love

आजरा : गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील सहा बेअरिंग चोरी प्रकरणी आजरा पोलीसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये या चोरीची फिर्याद देणारे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालकांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
स्क्रॅप खरेदीदार जैनुल शमशाद उर्फ बाबा खान (वय 54, रा. योगायोग नगर, पुजारी मळा इचलकरंजी), तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश रामचंद्र चव्हाण (वय 52 रा. पेद्रवाडी ता. आजरा), स्टोअर किपर दिनकर उर्फ गुलाब बाबुराव हसबे (वय 53 रा. चांदेवाडी ता. आजरा), सुरक्षा मुख्यााधिकारी भरत गणपती तानवडे (वय 62 रा. देवर्डे ता. आजरा), सुरक्षा रक्षक मनोहर यशवंत हसबे (वय 49 रा. चांदेवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
या चोरी प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. आणखी काहीजण संशयाच्या भोवर्‍यात आहेत. त्यासंदर्भात योग्य ते पुरावे हाती लागाताच त्यांनाही ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
आजरा साखर कारखाना दोन हंगाम बंद होता. 17 फेब्रुवारी 2019 ते 26 जुलै 2021 या काळात कारखान्यातील सहा बेअरिंगची चोरी झाली. यामध्ये 270 किलोच्या चार तर 92 किलोच्या दोन बेअरिंगचा समावेश होता. सहा बेअरिंगची किंमत 3 लाख 5 हजार 200 रूपये आहे. गेल्या एक वर्षापासून या प्रकरणाची तालुक्यात जोरदार चर्चा आहे. कारखाना प्रशासनाने चौकशी समिती नेमून 34 जणांवर ठपका ठेवला होता. त्यानंतर कारखाना कामगार संघटना व इतरांच्या निवेदनामुळे चोरी तपास प्रकरणाला वेग आला. अखेर गुरूवारी मध्यरात्री 12 वाजून 16 मिनिटांनी पाच संशयितांना आजरा पोलीसांनी ताब्यात घेतले, असल्याची माहिती आजर्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

श्री क्षेत्र जोतिबा यात्रा कालावधीत वाहतुक नियमन आदेश जारी

Spread the love  कोल्हापूर (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *