Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

गृहिणींचे बजेट कोलमडणार! डाळींच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता

  सर्व डाळींच्या उत्पादनांत यंदा मोठी घट नवी दिल्ली : किराणा मालाच्या भावात मागील महिन्याभरापासून खूप वाढ होत चाललीये. अशातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्व प्रकारच्या डाळींच्या उत्पादनांत यंदा चार लाख टनांची घट होणार असल्याचं समोर आलंय. तसंच यावर्षी सर्व प्रकारच्या डाळींच्या लागवडीत नऊ टक्क्यांची घसरण आहे . तर …

Read More »

पीओपी मूर्तींना यंदा शहराबाहेर थांबा?

  पर्यावरण पूरक मूर्तींचा आग्रह; नगरपालिका अलर्ट मोडवर निपाणी (वार्ता) : गणेश उत्सव काही महिन्यांवर असताना नगरपालिका यंदा प्लास्टर ऑफ पारस (पीओपी) मूर्तीच्या आयाती संदर्भात अलर्ट झाली आहे. पीओपी मूर्ती शहरात येणार नाहीत, याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे शहरामध्ये दाखल होणाऱ्या मूर्तीची संख्या यंदा घटण्याची शक्यता आहे. शिवाय माती …

Read More »

निपाणी तालुक्यात तालुका प्रशासनाकडून नुकसानग्रस्त घरांचा सर्व्हे : तहसीलदारांकडून पाहणी

  निपाणी (वार्ता) : गेल्या महिन्यात 15 जुलैनंतर पावसाचा जोर वाढला. परिणामी तालुक्यातील बहुतांशी बंधारे पाण्याखाली गेले होते. सध्या सर्व बंधाऱ्यांवरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. पाऊसही थांबल्याने तालुका प्रशासनातर्फे नुकसानग्रस्त घरांची पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार ए आणि बी प्रकारात घराचे नुकसान झाले असल्यास त्यांना पाच लाख रुपये भरपाई देण्यात …

Read More »

बेळगावात नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमेनतर्फे निदर्शने

  बेळगाव : मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार, हरियाणातील जातीय हिंसाचार, वाढते सायबर गुन्हे, महागाई आणि रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार याच्या विरोधात नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमेनच्या वतीनं बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मणिपूर येथे दोन जमातींमधील संघर्षात महिलांची काढलेली निर्वस्त्र धिंड, तेथील हिंसाचार, हरियाणातील मेवात व …

Read More »

राजगोळी खुर्द येथे क्रांती दिनानिमित्त “एक पुस्तक शाळेसाठी दान” उपक्रम, २७१ पुस्तके जमा

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्द. (ता चंदगड) येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने “एक पुस्तक गावासाठी” माजी सैनिक सत्कार व क्रांती दिन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी. बी. कवठेकर यांनी केले. ग्रंथ दिंडी पूजन लेखनिक महादेव …

Read More »

विश्वचषकातील 9 सामन्यांमध्ये बदल, भारत-पाकिस्तान लढतीच्या तारखेतही बदल

  नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 10 संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने विश्वचषक होणार आहे. स्थानिक स्थिती आणि काही संघाच्या विनंतीनंतर आयसीसीने विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आयसीसीने नऊ सामन्यांच्या तारखा बदलल्या आहेत. यामध्ये भारताचे दोन सामन्यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्यांचे स्तुत्य कार्य; जखमी गाईला जीवदान

  बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त झालेल्या एका गाईला सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवदान देऊन तिची रवानगी गो -शाळेत केल्याची घटना आज बुधवार सकाळी घडली. शहरातील गांधीनगर फ्रुट मार्केटनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर अज्ञात वाहनाच्या ठोकरीने एक गाय जखमी होऊन रस्त्यावर पडली होती. याबाबतची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, सौरभ …

Read More »

खानापूर तालुक्याला प्राथमिक शाळा शिक्षक बदलीचा फटका बसणार

  खानापूर (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच प्राथमिक शाळा शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पार पडली. याचा सर्वात जास्त फटका खानापूर तालुक्यातील शाळांना होणार आहे. कारण खानापूर तालुका हा अतिदुर्गम व जंगलाने व्यापलेला आहे. अशा तालुक्यातील गावांना वाहतुकीची सोय नाही. तसेच जंगल भागातील गावांना सुविधा नाहीत. अशा दुर्गम भागातील शाळांना जाणाऱ्या …

Read More »

सार्वजनिक वाचनालयातर्फे सप्टेंबरमध्ये संगीत भजन स्पर्धा

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव संस्थेतर्फे श्रावण मासानिमित्त बुधवार दि. ६ ते रविवार १० सप्टेंबरपर्यंत मराठा मंदिर येथे दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० वाजता संगीत भजन स्पर्धा आयोजिली आहे. सदर स्पर्धा महिला व पुरुष अशा गटात होणार असून दोन्ही गटातील विजेत्या भजनी मंडळांना रोख प्रत्येकी १० बक्षिसे तसेच स्मृतिचिन्ह …

Read More »

शहराच्या दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : शहराच्या दक्षिण भागात दुरुस्तीच्या कारणास्तव गुरुवार दि. १० रोजी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी ६ ते दुपारी १ यावेळेत वीजपुरवठा बंद केला जाणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे. खानापूर रोड, उद्यमबाग, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट, सुभाषचंद्र कॉलनी, औद्योगिक परिसर, जीआयटी कॉलेज परिसर, देवेंद्रनगर, महावीरनगर, खानापूर रोड, …

Read More »