Monday , September 21 2026
Breaking News

नागरगाळी नजीक टेम्पोची झाडाला धडक; चालक जागीच ठार

Spread the love

 

खानापूर : वैद्यकीय सामग्री व औषधांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोची झाडाला धडक बसून चालक जागीच ठार झाला. (सोमवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रामनगर-धारवाड मार्गावरील नागरगाळी नजीक असणाऱ्या वन खात्याच्या विश्राम धामसमोर हा अपघात घडला. बंगळूर येथून गोव्याच्या दिशेने वैद्यकीय सामग्री घेऊन जाणाऱ्या 407 टेम्पो चालकाला वळणाचा अंदाज आला नाही.
वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडेच्या झाडाला टेम्‍पोची धडक बसली. त्यात चालक सय्यद निजाम (वय 19, रा. बेंगलोर) हा जागीच ठार झाला. त्याच्याबरोबर असणारे माज शेख (वय 19) आणि तोहीर शेख (वय 19) दोघेही रा. बेंगलोर हे जखमी झाले आहेत.

ही धडक इतकी जोराची होती की, अपघातानंतर चालक निजाम याचा मृतदेह वाहनातच अडकून पडला आहे. लोंढा येथून क्रेन मागवण्यात आली, त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *