खानापूर (सुहास पाटील) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर मोठ मोठे खड्डे पडल्याची बातमी “वार्ता”मधुन प्रसिध्द होताच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डा बुजविला. मात्र इतर खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे इतर लहान खड्डे आता मोठे होणार आहेत. आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण …
Read More »खानापूर तालुक्यात वनप्राण्याकडून पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांना वालीच नाही.
खानापूर (सुहास पाटील) : खानापूर तालुका म्हणजे अतिघनदाट जंगलाने व्यापलेला तालुका त्यामुळे वनप्राण्याकडून नेहमीच शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. जंगल भागाबरोबर तालुक्यातील मलप्रभा नदीकाठी असलेल्या यडोगा, कुप्पटगिरी, बल्लोगा आदी भागातील उस पिकाचे ही जंगली डुक्कर, गवीरेडे आदी जंगली प्राण्याकडून प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे …
Read More »ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन
मुंबई : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात आज (3 ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली …
Read More »इंट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव लिटल चॅम्प्स आणि इंट्रॅक्ट क्लब ऑफ कट्टीमनी लिटल शाईनची स्थापना
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने इंट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव लिटल चॅम्प्स आणि इंट्रॅक्ट क्लब ऑफ कट्टीमनी रिटर्न शाईनचा स्थापना समारंभ तसेच मुलींचे क्षण आणि दत्तक घेणे दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता अधिकारी जिल्हा गव्हर्नर रोटरीयल नासिर बोरसादवाला, अध्यक्ष रोटेरियल कोमल कोल्लीमठ, …
Read More »खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्यावतीने ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार
खानापूर : खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा १२ वा वर्धापन दिन सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी श्री ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात सकाळी ११ वाजता संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. एम. भोसले गुरूजी होते. प्रमुख अतिथी म्हणून खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री …
Read More »मोबाईल चार्जिंग सॉकेटचा करंट लागून एका आठ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
कारवार : बुधवारी कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. मोबाईल चार्जिंग सॉकेटचा करंट लागून एका आठ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या कारवार तालुक्यातील सिद्धर येथील ही घटना आहे. या अपघाताने परिसरातील नागरिक हादरले आहेत. खेळता-खेळता चार्जरची पिन तोंडात घातली झाले असे की, सिद्धर येथील संतोष …
Read More »दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणी देण्यास कागल तालुक्यातून जोरदार विरोध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक बोलावणार कोल्हापूर : इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या दुधगंगा नदीतून सुळकूड पाणी योजनेवरून राजकीय घमासान सुरु आहे. कागल तालुक्यातून राजकारण्यांसह शेतकऱ्यांमधून या योजनेला प्रचंड विरोध केला आहे. दुसरीकडे, इचलकरंजीमधील राजकारणी सुद्धा आता एकत्र झाले आहेत. त्यामुळे चांगलाच पेच निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर …
Read More »माजी आमदार अरविंद पाटील नंदगड सोसायटीत सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार : महादेव कोळी
खानापूर : खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या नंदगड मुख्य कार्यालयाचा खत विक्रीचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आल्याची माहिती ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी यांनी आज खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना कोळी म्हणाले की, खानापूर तालुक्यातील नंदगड तालुका मार्केटिंग सोसायटीत खत विक्रीत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत आमच्या नेत्या …
Read More »आर्थिक व्यवहारातून बाळेकुंद्रीत युवकाला मारहाण
बेळगाव : आर्थिक व्यवहारातून एका युवकाला मारहाण केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द गावात घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शकील गुडुसाब बाळेकुंद्री, राहणार बाळेकुंद्री खुर्द या युवकाला पैसे वसुलीसाठी आलेल्या काही एजंटांनी पैसे न भरल्यावरून मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत शकीलने मारिहाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. …
Read More »अंगणवाडी कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
बेळगाव : मतदार यादीत नावनोंदणी, नावे वगळणे आदी कामे करण्यासाठी दिलेल्या बूथ लेव्हल ऑफिसरच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अधिकाऱ्यांची धमकी, दादागिरी थांबवावी आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी बेळगावात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेसच्या (आयटक) नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यांनी बेळगावात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta