Monday , September 21 2026
Breaking News

कापोली गावाजवळील घोस खुर्द येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

Spread the love

 

खानापूर : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची कापोली गावाजवळील घोस खुर्द येथे घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कापोली गावाजवळील घोस खुर्द गावातील शेतकरी भिकाजी मिराशी यांनी शनिवारी शेतात जात असल्याची माहिती आपल्या कुटुंबीयांना देऊन शेतात गेल्याची माहिती मिळाली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ते सापडला नाही. अखेर आज सकाळी कुटुंबीय त्याचा शोध घेण्यासाठी शेतात गेले असता त्यांना शेतात रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली.

सदर वृत्त समजताच खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांचे सांत्वन केले.

याबाबतचे वृत्त समजताच वनविभागाचे अधिकारी व पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *