Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

सरसकट कर्जमाफीसाठी बेळगावात विणकरांचे आंदोलन

  बेळगाव : संपूर्ण कर्नाटकात कर्जाच्या बोजामुळे 43 विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन विणकर संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यभरातील विणकर विविध कारणांमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत, शासनाच्या योजना विणकरांपर्यंत पोहोचत नसल्याने ते वंचित आहेत, विणकरांना असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा …

Read More »

ईडीकडून आप खासदार संजय सिंह यांना अटक

  नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली आहे. बुधवारी सकाळी ७ वाजता ईडीचे पथक त्यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले. 10 तास चाललेल्या छाप्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अबकारी धोरण प्रकरणाच्या आरोप पत्रातही संजय सिंह यांचे नाव आहे. या प्रकरणी मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत. …

Read More »

निपाणीतील युवकाच्या खून प्रकरणी संशयित आरोपींची कसून तपासणी

  निपाणी (वार्ता) : उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याच्या बहाण्याने मित्राचे अपहरण करून त्याचा भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) सकाळी उघडकीस आली. तर संशयित आरोपी कौस्तुभ अमोल औंधकर (वय २१, रा. मुगळे गल्ली, निपाणी) व शैलेश संभाजी बोधले (२३, रा. बालाजी नगर, निपाणी) हे दोघेही त्याच दिवशी …

Read More »

आंबेवाडीत जनावरांना लाळखुरकूत लसीकरण

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील आंबेवाडी गावामध्ये जनावरांना घरोघरी जाऊन लाळखुरकुत लसीकरण करण्यात आले. आंबेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ता राहुल भातकांडे यांनी विशेष परिश्रम घेत ही लसीकरण मोहीम यशस्वी केली. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप हन्नूरकर यांनी आंबेवाडी गावातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना लाळखुरकत रोगांची लक्षणे व …

Read More »

शहापूर पोलीस निरीक्षकपदी सिम्मनी यांची नियुक्ती

  बेळगाव : शहापूर पोलीस निरीक्षक पदी एस एस सिम्मनी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे. मावळते पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांची अन्यत्र बदली झाली आहे. सिम्मनी यांनी या अगोदर बेळगाव शहरात मार्केट पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्य केले होते. त्यावेळी त्या भागात शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

Read More »

पुण्याचे पालकमंत्रीपद अजित दादांकडे, तर सोलापूर, अमरावती चंद्रकांत पाटलांकडे

  राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर मुंबई : राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे पुणे- अजित पवार, अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील, …

Read More »

टी. बी. लोकरे यांना स्काऊट गाईडचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

  निपाणी (वार्ता) : भारत स्काऊट गाईड कर्नाटक राज्य प्रधान कार्यालय बंगळूर यांच्यातर्फे यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श स्काऊट गाईडचा शिक्षक पुरस्कार नांगनूर (ता. निपाणी) येथील शाळेतील स्काऊट, गाईडचे शिक्षक टी. बी. लोकरे यांना मिळाला. या पुरस्काराचे वितरण बंगळूर येथील कोंडजी बसप्पा सभागृहात झाले. अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य मुख्य आयुक्त पीजीआर सिंधिया तर …

Read More »

शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी भाजीपाला मार्केट

  आडी डोंगराजवळ होणार प्रारंभ; शेतकऱ्यांची थांबणार पिळवणूक निपाणी (वार्ता) : वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या बारमाही पाण्यामुळे ग्रामीण भागातील शेतीचे तंत्रज्ञान बदलले आहे. नगदी पिकाबरोबरच या भागातील अनेक शेतकरी भाजीपाला पिके घेत आहेत. पण बाजारपेठेत त्याची विक्री करताना व्यापारी व अडतांना किमान दहा टक्के कमिशन द्यावे लागते. शिवाय कवडी मोलाने …

Read More »

सिक्किममध्ये ढगफुटीमुळे पूर, लष्कराचे 23 जवान बेपत्ता

  नवी दिल्ली : सिक्कीममध्ये अचानक ढगफुटी झाल्याने तीस्ता नदीला पूर आला यामुळे भारतीय लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सिक्किममध्ये लष्कराचे 23 …

Read More »

मत्तिवडे मुख्य रस्त्याची दुरावस्था

  वाहनधारकांतून नाराजी : साईड पट्टीचे काम करा कोगनोळी : मत्तिवडे तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्गापासून ते गावापर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसापासून दुरावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत आहेत. यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी ताबडतोब लक्ष देऊन …

Read More »