Thursday , December 18 2025
Breaking News

Belgaum Varta

जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी केंद्रांना उद्या सुट्टी

  बेळगाव : गेल्या आठवडाभरापासून बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदीकाठावरील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रासह प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारी (ता. 27 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. …

Read More »

धामणे ग्रा. पं. पोटनिवडणुकीत यल्लाप्पा रेमानाचे विजयी

  बेळगाव : धामणे ग्रामपंचायतीच्या कुरबरहट्टी, धामणे वार्ड नं. 5च्या पोटनिवडणुकीत यल्लाप्पा रेमानाचे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून विजय संपादन केला आहे. धामणे ग्रामपंचायतच्या कुरबरहट्टी, धामणे वार्ड नं. 5 ची पोटनिवडणूक गेल्या रविवारी पार पडली. या निवडणुकीसाठी 951 पैकी 810 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीनंतर आज बुधवारी या निवडणुकीचा …

Read More »

पाण्याखाली येणाऱ्या नदीकाठच्या गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स संवाद बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे जनतेच्या हितासाठी कायमस्वरूपी पर्यायी मार्ग बांधण्याच्या शक्यतेचा आढावा घेऊन अहवाल पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील हवामान आणि पावसावर अवलंबून असलेल्या पिकांबाबत त्यांनी आज बुधवारी (26 जुलै) सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत …

Read More »

जिल्ह्यातील धबधब्यांच्या भेटींवर निर्बंध : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जनतेला जिल्ह्यातील सर्व पाण्याच्या धबधब्याजवळ जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. धबधब्याजवळ येताना फूटपाथ कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना राज्यभरात नोंदल्या जात आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील धबधब्याजवळील हालचालींवर निर्बंध घालण्यात आले …

Read More »

गणेशोत्सव मंडळांना वीज बिलात सवलत द्या

  मध्यवर्ती महामंडळाची मागणी; पालकमंत्री जारकीहोळींना निवेदन बेळगाव : हेस्कॉमने वीजदरात मोठी वाढ केल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे मंडळांना वीज बिलात सवलत देण्यात यावी. तसेच गणेशोत्सवाबाबत लवकर बैठक बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले. …

Read More »

निपाणीतील बगाडे प्लॉट येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरी

  निपाणी (वार्ता) : शहरातील उपनगरतील बगाडे प्लॉटमधील बंद असलेला बंगला फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना घडली. घर मालक बाहेरगावी नोकरीसाठी असल्यामुळे चोरांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र किरकोळ लहान मुलांचे दागिने चोरांनी लंपास केले आहेत. याबाबत घटनास्थळावर समजलेली माहिती अशी, बगाडे प्लॉट येथे सरताज इचलकरंजे यांचा बंगला आहे. …

Read More »

गृहलक्ष्मी योजसाठी बँक पासबुक आधार लिंकसाठी बँकांमध्ये गर्दी

  सर्व्हर डाऊनचा फटका; दिवसभर नागरिकांच्या रांगा निपाणी (वार्ता) : गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजनेला प्रारंभ झाला असून गावागावांतून नोंदणीकरण आणि पासबुक काढण्यासाठी गर्दी होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील बापूजी सेवा केंद्र आणि ग्रामवन मधून गर्दी होत आहे. परंतु, सर्व्हर डाऊनचा फटका अनेकठिकाणी बसत आहे. त्यामुळे दिवसभर बँका आणि इतर ठिकाणी रांगा …

Read More »

रमाकांत कोंडुसकर यांनी घेतली विस्थापित विणकर कुटुंबांची भेट

  बेळगाव : कल्याणनगर, वडगाव येथे मुसळधार पावसामुळे पडझड झालेल्या घरांना आज सकाळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सध्या पडणाऱ्या पावसामुळे कल्याणनगर, वडगाव येथील प्रेमा परशराम ढगेन्नावर, प्रसाद बसवराज मळी …

Read More »

दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निपाणी व कागल तालुक्यात पाऊस थोडा कमी असला तरी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर असल्याच्या कारणाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. …

Read More »

सांबरा ग्रा. पं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रचना गावडे विजयी तर उपाध्यक्षपदी मारुती जोगाणी

  सांबरा : सांबरा ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली. अध्यक्षपदी रचना राहुल गावडे तर उपाध्यक्षपदी मारुती टोपाण्णा जोगाणी हे निवडून आले आहेत. मंगळवार दि. २५ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. अध्यक्षपद सामान्य महिला तर उपाध्यक्षपद सामान्य पदासाठी जाहीर करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे रचना …

Read More »