खानापूर : खानापूर तालुका हा अति पावसाचा तालुका अशी ओळख आहे. गेल्या आठवड्यापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने नदी, नाल्यासह, तलावाना पूर आला आहे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने सर्वच पीके पाण्याखाली गेली आहेत. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील खेड्यात घरांना गळती लागुन घराच्या भिंती …
Read More »गर्लगुंजी ग्रा. पं. अध्यक्षपदी सौ. ललिता कोलकार, उपाध्यक्षपदी सौ. रेखा कुंभार यांची निवड
खानापूर : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील ३० महिन्याच्या कालावधीसाठी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड सोमवारी दि. २४ रोजी ग्राम पंचायतीच्या सभागृहात पार पडली. यावेळी गर्लगुंजी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण एस सी महिला गटासाठी आले होते. तर उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सामान्य महिला गटासाठी आले …
Read More »वृद्ध भिक्षुक महिलेच्या मदतीला धावले सामाजिक कार्यकर्ते
बेळगाव : पांगुळ गल्ली येथे जवळपास तीन दिवसापासून रस्त्याशेजारी झोपून असलेल्या एका असहाय्य वृद्ध भिक्षुक महिलेच्या मदतीला धावून जात सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. याबाबतची संक्षिप्त माहिती अशी की, पांगुळ गल्ली येथील एका दुकानदाराचा स्वस्तिक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना फोन आला. त्या दुकानदाराने गल्लीत एक वृद्ध महिला रस्त्या …
Read More »किटवाड धबधबा, धरणाच्या ठिकाणी 3 ऑगस्टपर्यंत पर्यटनास बंदी!
चंदगड : मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून किटवाड येथील दोन्ही धरणांसह तेथील धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाला की किटवाड (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील दोन्ही धरणे भरून ती ओव्हर फ्लो कालव्यातून वाहू लागते. त्या दोन्ही धरणावर …
Read More »ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. जयंत सावरकर यांच्या …
Read More »पंचगंगा नदीची इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल; पूरबाधित गावांसह क्षेत्रांमध्ये स्थलांतर सुरु
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सर्वदूर सुरु असलेल्या पावसाने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने आज (24 जुलै) पहाटेच्या सुमारास इशारा पातळी गाठली. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फूट आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर आज …
Read More »आंबोली विशेष बससेवा तात्पुरती स्थगित
बेळगाव : वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोलीसाठी दर शनिवार आणि रविवारी सुरू करण्यात येणारी विशेष बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आंबोलीत अधिक पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे परिवहनने हा निर्णय घेतला आहे. मात्र, येणाऱ्या आठवडाभरात ही बससेवा पुन्हा सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. मागील आठवडाभरापासून दमदार पावसाला …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे गुणवंतांचा गौरव
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनोद गायकवाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. व्यासपीठावर उद्योजक विजय कंग्राळकर, राजीव साळुंखे, अभियंता संग्राम गोडसे, दीपक किल्लेकर, रेणुका …
Read More »निपाणी तालुक्यातील ३५ हजारावर लोकांना ‘धनभाग्य’ ची प्रतीक्षा!
आधार लिंक, केवायसीच्या समस्या ; शहर ग्रामीण भागात गर्दी निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने अन्नभाग्य योजनेअंतर्गत पाच किलोवरील धान्याची रक्कम थेट संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे रेशनकार्डधारकांच्या खात्यावर सदर पैसे जमा होत आहेत. निपाणी तालुक्यात एकूण 67 हजार 386 बीपीएल तर 1580 अंत्योदय रेशनकार्डधारकांना या योजनेचा …
Read More »मेरडा- करजगी रस्त्यावरील तलावाचा बांध ग्रा. पं. अध्यक्षांच्या दक्षतेने बचावला!
खानापूर : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मलप्रभा नदीसह नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याच्या प्रवाहामुळे बंद झाले आहेत. तालुक्यातील मुसळधार पावसामुळे हालगा ग्राम पंचायत हद्दीतील मेरडा -करजगी रस्त्यावरील मोठा तलाव काठोकाठ भरून ओसंडत असताना तलावाचा मोठा बांध फुटला जात असल्याची घटना हलगा ग्राम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta