Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक

बेळगाव : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातुन अधिकृत उमेदवार म्हणून श्री. आर. एम. चौगुले यांची सर्वानुमते निवड झाली असून, पुढील रणनीती ठरविण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या मंगळवार दिनांक १८ रोजी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती कार्यालय सदाशिवनगर (लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या मागे) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व आजी-माजी …

Read More »

शिक्षक भरकटल्यास समाज भरकटेल

प्राचार्य डॉ. व्ही. एल. पुजारी : शिक्षक, विद्यार्थी संघाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देवाने पालक आणि शिक्षक निर्माण केले आहे. त्यामुळे देव सर्वत्र असू शकत नाही. शिक्षक हेच विद्यार्थ्यांना उपदेश देतात. शिक्षकच भरकटले तर संपूर्ण समाज भरकटेल, असे मत प्राचार्य डॉ. व्ही. एल. पुजारी यांनी व्यक्त केले.  येथील केएलई संस्थेच्या …

Read More »

काका पाटलांना मताधिक्य देणार

  ग्राम पंचायत सदस्यांचा निर्धार : प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कोगनोळी : काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील यांना कोगनोळी गावातून भरघोस मताधिक्य देणार असा निर्धार ग्रामपंचायत सदस्यांनी केला. कोगनोळी तालुका निपाणी येथे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष …

Read More »

जेडीएसचे नासीर बागवान यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  खानापूर : खानापूर जेडीएसचे अधिकृत उमेदवार नासीर बागवान यांनी आपल्या समर्थकासोबत नामपत्र दाखल केले आहे. सोमवारी श्री छत्रपती शिवाजी स्मारक येथे येऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नामपत्र दाखल करण्यासाठी खानापूर तहसीलदार कार्यालयाकडे प्रयाण झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना उमेदवार नासीर बागवान म्हणाले की, खानापूर तालुक्याचा दुर्दैव …

Read More »

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक उद्या

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे चारही मतदार संघासाठी उमेदवार निश्चित झाले असून उमेदवारांच्या नावाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीसाठी बेळगाव उत्तरमधून अमर येळ्ळूरकर, दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर, ग्रामीणमधून आर. एम. चौगुले आणि खानापूरमधून मुरलीधर पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी …

Read More »

ज्येष्ठ सीमा सत्याग्रही काॅ. कृष्णा मेणसे यांचे कोंडुसकरना आशीर्वाद

  बेळगाव : बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज सकाळी ज्येष्ठ सीमा सत्याग्रही व कामगार नेते काॅ. कृष्णा मेणसे यांची सदिच्छा भेट घेऊन निवडणुकीसाठी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. बेळगाव दक्षिण मतदार संघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आज सोमवारी सकाळी सरस्वतीनगर …

Read More »

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा काँग्रेस प्रवेश

  नवी दिल्ली : कर्नाटक राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षणोक्षणी अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या पाठोपाठ, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी काल भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकला. त्यानंतर शेट्टर यांनी काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने शेट्टर यांना हुबळी-धारवाड सेंट्रल मधून उमेदवारी …

Read More »

महामार्गावरील वृक्षांची तोड; रस्ता झाला उजाड

  सावली गायब : प्रवाशांना उन्हाचा सामना कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे या ठिकाणी असणाऱ्या दोन्ही बाजूच्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे. महामार्गाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या वृक्षांची तोडणी झाल्याने महामार्ग उजाड दिसू लागला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने महामार्गावरून जाताना …

Read More »

आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराचा झंझावाती शुभारंभ

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज उचगाव येथील श्री मळेकरणी देवस्थानात पूजन करून प्रचाराचा झंझावाती शुभारंभ केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्री मळेकरणी देवस्थानात पूजन …

Read More »

आर. एम. चौगुले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या वननेस प्राईड येथे मोठ्या थाटामाटात करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी आणि समितीला विजयी करण्याचा निर्धार करत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. ऍड. …

Read More »