खानापूर : खानापूर तालुक्यातील देवलट्टी गावाला सातत्याने विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवारच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे देवलत्ती गावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गावातील वीज समस्येची दखल घेऊन भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी ऊर्जामंत्री सुनिल कुमार यांना पत्र पाठविले. देवलत्ती गावातील सध्याची गर्लगुंजी वीजवाहिनी …
Read More »19 मार्चच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला राजहंसगडवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचे आवाहन
बेळगाव : राष्ट्रीय पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दोन वेळा अनावरण करून आणि त्यांचा वापर राजकारणासाठी करून मोठा अपमान केला आहे. याविरोधात मराठी माणसाने पेटून उठले पाहिजे. संघटित झालो तरच मराठी माणसांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे 19 मार्च रोजीच्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण कार्यक्रमाला राजहंसगडवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, …
Read More »शहरवासीयांच्या पाण्यापेक्षा खेळालाच महत्त्व
नगरसेवक विलास गाडीवड्डर : शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : आपल्या कारकिर्दीमध्ये २४ तास पाणी योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. पण त्यानंतर येथील नगरपालिकेमध्ये अपक्षांच्या मदतीने भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. या पाच वर्षाच्या काळात नगराध्यक्षासह सभागृहाला उर्वरित १० टक्के काम पूर्ण करता आले नाही. त्यांच्या या …
Read More »रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी कारवाई
मुंबई : रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचं पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे. उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. आज त्यांच्यावर ईडीकडून कारवाई …
Read More »नितिन पाटील यांची शिनोळी राजर्षी शाहू विद्यालयाला संगणकाची भेट
शिनोळी (प्रतिनिधी) : शिनोळी येथील ग्राम पंचायत माजी सरपंच व विद्यमान सदस्य नितिन नारायण पाटील यांनी नुकताच एका कार्यक्रमामध्ये राजर्षी शाहू विद्यालयाला संगणक भेट दिला. यावेळी अध्यक्षस्थानी उपसरपंच पुंडलिक गवसेकर होते. “आज संगणक हा शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारला गेला आहे. आज विद्यार्थ्यांचे भविष्य संगणकाशी जोडलेले आहे. आपल्याला लिपिक …
Read More »कृतीतून महिलांचा आदर व्हावा : योगिता कांबळे
मानवाधिकार संघटनेतर्फे महिला दिन निपाणी : स्त्रियांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून सक्षम बनावे. दैनंदिन जीवनात वेळेचे नियोजन करून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. मुलांनाही घरातील कामे करण्याच्या सवयी लावून मुलींचा व स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार रूजवावेत. आई, बहीण, पत्नी व मुलगी या नात्यासोबतच महिला अनेक भूमिका जगत असतात. फक्त महिला …
Read More »पोलिसांवर हल्ला प्रकरण; शिवप्रेमींची निर्दोष मुक्तता
बेळगाव : पोलिसांवर हल्ला करणे आणि डिजेचा कर्णकर्कश आवाज करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणांतून चार शिवप्रेमींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. विजय मोहिते, गजानन डोंगरे, सतीश घसारी, दुर्गेश घसारी (सर्व रा. टेंगिनकेरा गल्ली) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या चित्ररथ देखाव्यावेळी त्यांनी हा हल्ला केल्याचा …
Read More »मल्लिकार्जुन वृद्धाश्रमामध्ये एंजल फाउंडेशनच्या वतीने महिला दिन साजरा
बेळगाव : शाहूनगर येथील श्री मल्लिकार्जुन वृद्धाश्रममध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. वृद्धाश्रमातील आजींच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच आश्रमातील आजींना बिस्कीट, पुलावचे वाटप सुद्धा करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या हस्ते वृद्धाश्रममधील आजींचा शाल …
Read More »शहापूर परिसरातील विहिरींचे पाणी दुषित….!
बेळगाव : गेल्या दोन वर्षांपासून खराब असलेली ड्रेनेज वाहिकेमुळे कोरे गल्ली येथील विहिरींचे पाणी दूषित झाले असून यासंबधी गेल्या महिनाभरात ७ ते ८ वेळा तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांच्याकडे करण्यात आली, पण हे तात्पुरती व्यवस्था करत असल्यामुळे पुन्हा पुन्हा ड्रेनेज वाहिका खराब तर होतच आहे पण विहिरी कायमस्वरुपी …
Read More »आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू
केंद्रीय पथक बंगळुरात दाखल; अधिकारी व राजकीय पक्षांशी चर्चा बंगळूर : राज्यात निवडणुकीचा ज्वर हळूहळू वाढत असतानाच, निवडणूक आयोगही स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्व प्रकारची तयारी करत आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचे आज तीन दिवसांसाठी राज्यात आगमन झाले. विधानसभा निवडणुकीच्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी राजकीय पक्षांसह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta